Wednesday, January 3, 2018

MUSINGS FROM PRIYADARSHINI KARVE: Quest for Carbon Negativity Part 1 शोध कार्बन निगेटिव्हिटीचा भाग १

Samuchit Trashflasher Kiln
समुचित ट्र्रॅशफ्लॅशर भट्टी
Samuchit Sampada Stove (Mini Trashflasher)
समुचित संपदा शेगडी (मिनी ट्रॅशफ्लॅशर)

As the topic of this blog is of local and global importance, I am writing in both English and Marathi.

या ब्लॉगचा विषय स्थानिक आणि जागतिक महत्वाचा असल्यामुळे इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये लिहिते आहे.


If you have a garden, you are aware that throughout the year a lot of garden waste is being generated. If you have big trees, they shed a lot of leaves especially during winter. These leaves, and other wastes like twigs, etc. too, if left as they are, will eventually decompose and will improve soil quality. In many cases to clean the garden, the waste is swept to one side and burnt off. Environmentally conscious individuals would compost rather than burn.

तुमच्या इमारतीभोवती बाग असेल, तर बागेत वर्षभर जैव कचरा निर्माण होत रहातो, हे तुम्ही पाहिले असेल. मोठे वृक्ष असतील तर विशेषतः हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर पानगळ होत असते. ही पाने आणि इतरही काटक्या कुटक्या वगैरे जमिनीवर तशाच राहू दिल्या तर कालांतराने त्या कुजतात, आणि मातीची सुपीकता वाढवण्याला हातभार लावतात. पण बऱ्याच ठिकाणी बाग स्वच्छ करण्यासाठी सगळा कचरा झाडून एका बाजूला केला जातो आणि जाळून टाकला जातो. पर्यावरणाबाबत जागरूक असलेल्या व्यक्ती जाळून टाकण्याऐवजी त्याचे कंपोस्ट करतात. 

Burning in open air is obviously the worst of the three options, as it leads to a lot of local pollution. Composting is time consuming and also needs space and daily attention. Letting the biomass waste generated by plants lie on the soil around their roots is the best and most natural option. However, this makes your garden look unkempt, and also there is danger of snakes and other harmful animals taking shelter in the layer of dry leaves and twigs. There is also the risk of fire if someone drops a burning cigarette butt, etc., on the leaf litter.

उघड्यावर कचरा जाळणे हा अर्थातच तिन्हीपैकी सर्वात वाईट पर्याय आहे, कारण त्यातून मोठ्या प्रमाणावर स्थानिक प्रदूषण होते. कंपोस्ट करणे वेळखाऊ आहे, त्यासाठी जागा लागते, आणि रोज लक्ष द्यावे लागते. वनस्पतींनी निर्माण केलेला जैव कचरा तसाच त्यांच्या मुळांशी मातीत पडू देणे हा सर्वात चांगला व नैसर्गिक पर्याय आहे. मात्र यामुळे आपली बाग नीटनेटकी दिसत नाही. शिवाय साप किंवा इतर उपद्रवी जीव या पालापाचोळ्याच्या आणि काडीकचऱ्याच्या थरात आश्रय घेण्याचा धोका असतो. जर कोणी सिगरेटचे थोटूक या कचऱ्यात टाकले, तर आग लागण्याचाही धोका असतो.

From climate change perspective, all three options have the SAME effect - the carbon removed from the atmosphere by the plants through photosynthesis, is returned to the atmosphere, either through natural decay, or burning, or composting.

क्लायमेट चेंजच्या दृष्टिकोनातून विचार केला, तर वरील तिन्ही पर्यायांचा परिणाम एकच होतो – वनस्पतींनी प्रकाशसंश्लेषणाद्वारे हवेतून काढून घेतलेला कार्बन नैसर्गिक रित्या कुजण्यातून, किंवा ज्वलनातून किंवा कंपोस्टिंगच्या क्रियेतून पुन्हा हवेत परत जातो.

There is a FOURTH option of charring the garden waste. This will allow you to capture 30% of the carbon in the waste in the form of char - solid carbon that will remain as it is for thousands of years, if left untouched. In other words, 30% of the carbon is permanently removed from the return path of the biological carbon cycle loop. You have made your garden Carbon Negative!

एक चौथा पर्यायही आहे – बागेतल्या कचऱ्याचा कोळसा करणे. यामध्ये कचऱ्यात असलेल्या एकूण कार्बनपैकी ३० टक्के कार्बन कोळसा या स्वरूपात हवेत न जाता मागे रहातो. जर तुम्ही या कार्बनला अजिबात हातही लावला नाही, तर तो हजारो वर्षे याच स्वरूपात रहाणार आहे. थोडक्यात म्हणजे तुमच्या बागेत चालू असलेल्या जैविक कर्बचक्रातला ३० टक्के कार्बन तुम्ही चक्राच्या परतीच्या मार्गातून कायमस्वरूपी बाहेर काढला. तुमची बाग तुम्ही कार्बन निगेटिव्ह केली!

Samuchit Trashflasher Kiln:

समुचित ट्रॅशफ्लॅशर भट्टी:

The size of garden space and therefore the amount of garden waste generated on the campus of a housing society or educational or research campus, or factory or business premises, etc. is rather high. This kiln is designed for such users. It disposes off about 3-4 kg of garden waste in 15-20 min and generates about 1-2 kg of char.
Price inclusive of taxes: INR 5000, includes on site demonstration and training anywhere in Pune

गृहनिर्माण संस्था, शैक्षणिक किंवा संशोधन संकुल, कारखाने व इतर व्यावसायिक परिसर अशा ठिकाणी बागेची व्याप्ती आणि त्यामुळे रोज निर्माण होणाऱ्या जैविक कचऱ्याचे प्रमाणही जास्त असते. ही भट्टी अशा ठिकाणी वापरण्यासाठी बनवलेली आहे. दर १५-२० मिनिटांत ३-५ किलो कचऱ्याची विल्हेवाट लावून साधारण १-२ किलो कोळसा निर्माण करण्याची या भट्टीची क्षमता आहे.
करासहित किंमत रू ५०००. पुण्यात ग्राहकाच्या ठिकाणी प्रात्यक्षिक व प्रशिक्षण अंतर्भूत.

Samuchit Sampada Stove (mini trashflasher):

समुचित संपदा शेगडी (मिनी ट्रॅशफ्लॅशर):

This very handy ‘mini trashflasher’, is best suited for dealing with small quantities of garden waste generated in private gardens. If you are generating waste in the form of twigs and small branches, it can also be used as a stove for heating bath water.
Price inclusive of taxes: INR 3500, includes demonstration and training at our office

व्यक्तिगत छोट्या बागेत निर्माण होणाऱ्या कमी कचऱ्यासाठी ही एक वापरायला अतिशय सोपी अशी मिनी ट्रॅशफ्लॅशर भट्टीच आहे. काटक्याकुटक्यांच्या स्वरूपातला कचरा असेल, तर अंघोळीचे पाणी तापवण्याची शेगडी म्हणूनही तिचा वापर होऊ शकतो.
करासह किंमत रू ३५००. आमच्या कार्यालयात प्रात्यक्षिक व प्रशिक्षण अंतर्भूत.

I want to share much more with you... Part 2 coming soon!

आणखीही पुष्कळ सांगायचे आहे... दुसरा भाग लवकरच येतो आहे!


Priyadarshini Karve

Samuchit Enviro Tech, Pune


प्रियदर्शिनी कर्वे
समुचित एन्व्हायरो टेक, पुणे







#BeModernBeResponsibleBeRespectful




Samuchit Enviro Tech         samuchit@samuchit.com         www.samuchit.com

No comments: